Sunday, 13 January 2013

शुभ मकरसंक्रांत

 
मराठी  अस्मिता 

मराठी मान
 
मराठी प्रेमाची 

मराठी शान 

मकरसंक्रांतीचा सण 

घेवून आला

नवचैतन्याची खाण 

तीळ  गुळ  घ्या

गोड गोड बोला
 शुभ मकरसंक्रांत 

Tuesday, 18 December 2012


v     मराठी माणुस
घडाळ्याचा गजरावर ताडकन उठतो,
टीव्ही पाहत रात्री नकळतच झोपतो
,
नित्यकर्म सांभाळतच,दिवसभर थकतो
,
एक चाकोरीबद्ध आयुष्य हा प्राणी जगतो
.
चोपडे पणा याला जमत नाही,म्हणून उगाच मान नाही डोलत
,
स्वतःचा फटत्कल्पणाचाच याला अभिमान,कारण कधी खोट नाही बोलत
,
गुप्त शत्रूंपासून नेहेमीच बेसावध,कारण आपल्याच विश्वात गर्क
,
म्हणूनच उद्योग धंद्याचा यथास्थित जगात,सदैव ठरतो मूर्ख
.
याला हाय वे, लिंक रोड,फक्त एक संपणारा सरळ रस्ता
,
ऑफिस मध्ये बॉसच्या घरी बायकोचा नियमित खाणे खस्ता
.
या गर्दी धक्यात कधी यालाही वाटत,कि एक गाडी घ्यावी
,
रोज तर पांचट ताक पितोच,कधी लास्सीही प्यावी
.
जातीचा याला अति बाणा,जणू सात जन्माचा नवाबी
,
काळ्याशार भविष्याच्या अंधारात रंगवितो स्वप्नं गुलाबी

रसरशीत आयुष्य सुकवून,घालवतो सगळे सत्व ,
समृद्धीची चवच नसल्याने,खातो पोळीशी तत्व
.,
मैफिल याची चहा वा पान टपरी,कारण इकडेच काय तो मिळतो मानाचा मुजरा
,
ओल्या मनाची रसिकता याची,नाही विसरत आणायला बायकोला गजरा
.
चाळून काढतो अख्खे आयुष्य,वेचण्यात सुखसमृद्धीच्या अणू रेणुस
,
अल्प संतुष्टी जगावेगळा,हा एकच मराठी माणूस
.
चारुदत्त अघोर.